Join us  

मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका; हायकोर्टात होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 1:59 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे.

Maratha Reservation ( Marathi News ) : मुंबई-  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. यासाठी २६ जानेवारी पर्यंत राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव मुंबईत येत आहे. मनोज जरांगे पाटील आज पुण्यात पोहोचले आहेत.तर दुसरीकडे, मुंबई हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली असून आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज सुनावमी होणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारावी अशी मागणी या याचिकेत केली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह पुण्यात पोहोचले असून ते पुण्यातून पनवेल असा प्रवास करत मुंबईत पोहोचणार आहेत. या सुनावणीत हायकोर्ट काय निर्देश देतं हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील

आपल्याला कोणाला वेठीस धरण्याचा अधिकार नाही- सदावर्ते

" संविधानीक अधिकारात शांततेत काही करण्याचा अधिकार आहे. शांतता उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही, मनोज जरांगेंची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, असा आरोपही सदावर्ते यांनी केला. आम्ही न्यायालया या सर्व गोष्टी सांगितल्या आहे. ही केस आता न्यायालयासमोर आली आहे, आज पुण्यात मोठी रांग आहे. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत एवढे मोठे आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही सदावर्ते म्हणाले.  

आम्हाला राजकारणात यायचं नाही- जरांगे पाटील

लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. आज ते शहराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरातील उपनगरातून मोठ्या संख्येने पुढे जात आहे. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मोर्चामध्ये पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही राजकारण येणार आहात का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी तिकडं लय पैसा लागतो असं सूचक वक्तव्य केलं आहे. 

पाटील म्हणाले, आम्ही सामान्य माणूस आहोत. आम्हाला राजकारणात यायचं नाही. तिकडं लय पैसा लागतो. ते आपलं काम नाही. आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत. आम्हाला फक्त आरक्षण द्या.  मुंबईत जमावबंदी आहे तरी तुम्ही एवढा मोर्चा घेऊन तिकडं चालला आहात? असे विचारले असता जारांगे पाटील म्हणाले, आमच्यासाठी जमावबंदी आहे असं काही नाही. मुंबईच्या वाहनांना प्रवेश नाही असंही काही नाही. ते मोठं शहर आहे. विविध कारणास्तव तिकडं जमावबंदी लागू केली जाते. आम्हाला मुंबईला जायची हौस नाहीये. शासनाने सांगितलं कि, ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. 

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेमनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षण