बेरोजगार झालेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची कामासाठी याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:01 AM2020-07-18T07:01:32+5:302020-07-18T07:01:49+5:30
या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिश्त यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने एअर इंडियाला दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
मुंबई : कोरोना, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या एअर इंडियाच्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी काम मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीे. एअर इंडियाला कर्मचाºयांना काम देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिश्त यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने एअर इंडियाला दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
एअर इंडिया लि. कामगार संघाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, हे २५० कर्मचारी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. एअर इंडियाकडून मिळणाºया दैनंदिन भत्त्यावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वर्षाचे २४० दिवस या कर्मचाºयांना एअर इंडियाकडून काम देण्यात येते. प्रत्येक दिवशी त्यांना ५३५ रुपये दैनंदिन भत्ता मिळतो.
हे कर्मचारी गेली २५-३० वर्षे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसचालक, सामान वाहक, सुरक्षारक्षक अशी कामे करीत आहेत. मे महिन्यात विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या जवळपास राहणाºया कामगारांना कामावर बोलावण्यात आले. २५० लोकांना कामावर बोलावण्यात आले नाही.