Join us

कंगनाचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:19 AM

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यासाठी उच्च न्यायालयात गुरुवारी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली.वेगवेगळ्या ...

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यासाठी उच्च न्यायालयात गुरुवारी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली.

वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कंगनाने वारंवार ट्वीट केल्याचा आरोप करत ॲड. अली काशीफ खान देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच न्यायपालिकेला ‘पप्पू सेना’ असे संबोधल्याने कंगनाविरोधात अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. या आधारावर कंगनाचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करावे, अशी विनंती याचिकेत आहे. त्यासाठी देशमुख यांनी ट्विटर आयएनसीला प्रतिवादी केले.

कंगना न्यायपालिका, राज्य सरकार, मंत्री आणि मुंबई पोलिसांना ट्विटरवरून सतत लक्ष्य करत आहे, असेही देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. याआधीही देशमुख यांनी कंगना व तिची बहीण रंगोली विरोधात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास तबलिगी जमात जबाबदार असल्याचे विधान तिने ट्विटरवर केले होते. त्यावरून देशमुख यांनी तिच्याविरुद्ध न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली.