मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 10:10 AM2024-11-10T10:10:01+5:302024-11-10T10:10:19+5:30

मोबाइलवर बंदी घातल्याने ओळखपत्रासाठी डिजिलॉकवर अवलंबून असलेल्या मतदारांची गैरसोय होऊ शकते.

Petition in High Court against mobile ban on polling stations | मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा

मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उजाला  श्यामबिहारी यादव यांनी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल आणण्याची आणि  डिजिलॉकद्वारे ओळखपत्र सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. ‘डिजिलॉक ॲप’ला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

मोबाइलवर बंदी घातल्याने ओळखपत्रासाठी डिजिलॉकवर अवलंबून असलेल्या मतदारांची गैरसोय होऊ शकते.  त्यामुळे या उद्देशासाठी मतदारांना मोबाइल फोन वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने  १४ जून २०२३  रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील संदिग्धतेच्या संदर्भात अॅड. जगदिश सिह यांच्यामार्फत यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Web Title: Petition in High Court against mobile ban on polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.