Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 07:41 AM2018-11-04T07:41:12+5:302018-11-04T07:44:34+5:30
Petrol & Diesel Prices : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्याचप्रमाणेच आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्याचप्रमाणेच आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात 21 पैशांची घट झाल्यानं मुंबईकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी आता 84.28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या दरात 18 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे डिझेलचे आजचे प्रतिलिटर दर 76.88 रुपये एवढे आहेत.
राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे येथे प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.78 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 73.36 रुपये मोजावे लागणार आहेत.
(निवडणुकांसाठीच पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीचे सत्र)
Petrol & diesel prices in #Delhi today are Rs 78.78 per litre (decrease by Rs 0.21) & Rs 73.36 per litre (decrease by Rs 0.17),respectively. Petrol & diesel prices in #Mumbai today are Rs 84.28 per litre(decrease by Rs 0.21) &Rs 76.88 per litre (decrease by Rs 0.18), respectively pic.twitter.com/NdWrcgQ6gY
— ANI (@ANI) November 4, 2018
मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.