Join us

पेट्रोल ८० पैसे, डिझेल १.३० रुपयाने स्वस्त

By admin | Published: April 16, 2015 2:28 AM

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या किमतीतही कपात करण्यात आली. पेट्रोल प्रतिलीटर ८० पैसे तर डिझेल १.३० रुपयांनी स्वस्त झाले.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या किमतीतही कपात करण्यात आली. पेट्रोल प्रतिलीटर ८० पैसे तर डिझेल १.३० रुपयांनी स्वस्त झाले. यामध्ये स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नाही. परिणामी, प्रत्यक्षातील दर हे पेट्रोलसाठी लीटरमागे १ रुपया तर डिझेलसाठी लीटरमागे दीड रुपयाच्या आसपास कमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.