Join us

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:07 AM

मुंबई : तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. रविवारी मुंबईत पेट्रोलचे दर २८ पैशांनी, तर ...

मुंबई : तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. रविवारी मुंबईत पेट्रोलचे दर २८ पैशांनी, तर डिझेलचे दर ३४ पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ९५.१६ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८५.९८ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. ६ जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात चार महानगरांपैकी मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत.

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सरकारला या इंधन दरवाढीबाबत काही घेणे देणे नाही. या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. सरकारने इंधनदर कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत.

- एम.वेंकट राव, अध्यक्ष ,पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशन

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे, मुंबईत पेट्रोल ९५.१६ आणि डिझेल ८५.९८ दराने मिळत आहे. आणखी दरवाढ झाली, तर आम्हाला इंधन विकणे कठीण होणार आहे. कारण आमच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेत ९९.९९पर्यंतचे दर मशीनमध्ये दिसतात. जर दराने शंभरी ओलांडली तर ते मशीनमध्ये दिसणार नाही. त्यामुळे मशीनचे स्वाफ्टवेअर अपडेट करण्याची गरज आहे.

- रामनिवास कुमहार, पेट्रोलपंप चालक