Join us

Petrol And Diesel Prices : पेट्रोल 25 पैसे तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 8:05 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा घट झाली आहे. यामुळे देशवासीयांना थोडासा का होईना, पण दिलासा मिळत आहे.

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. यामुळे देशवासीयांना थोडासा का होईना, पण दिलासा मिळत आहे. आज मुंबईत पेट्रोल 25 पैशांनी , तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. घटलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 87.21 रुपये, तर डिझेलसाठी प्रतिलिटर 78.82 रुपये मोजावे लागतील. इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मात्र सलग चौथ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होत आहे. 

दिल्लीतही पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त झाले आहेत. दिल्लीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी 81.74 रुपये मोजावे लागणार आहेत, तर डिझेल प्रतिलिटर किंमत 75.19 एवढी आहे.

(अहो आश्चर्यम्! आज पेट्रोल, डिझेलचे दर घटले)

 पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील घट

            तारीख                      पेट्रोल/ प्रतिलिटर             डिझेल/ प्रतिलिटर
18 ऑक्टोबर              88.08 रुपये (0.21पैशांची घट)79.24 रुपये (0.11 पैशांची घट)
19 ऑक्टोबर              87.84 रुपये (0.24 पैशांची घट)79.13 रुपये (0.11 पैशांची घट)
20 ऑक्टोबर              87.46 रुपये (0.38 पैशांची घट)79.00 रुपये (0.13 पैशांची घट)
21 ऑक्टोबर             87.21 रुपये (0.25 पैशांची घट)78.82 रुपये (0.18 पैशांची घट) 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात केली होती. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलनं नव्वदी पार केल्यानंतर आणि देशातील महानगरांमध्ये पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करत असताना सरकारनं हा निर्णय घेतला होता.  

18 ऑक्टोबर 2018

 

19 ऑक्टोबर 2018

 

20 ऑक्टोबर 2018

 

टॅग्स :पेट्रोलडिझेलमुंबई