Today's Fuel Price: पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 09:10 AM2018-11-06T09:10:07+5:302018-11-06T09:24:05+5:30
Today's Fuel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज पुन्हा घट झाली आहे.
मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैशांनी तर डिझेलचे दर 10 पैशांनी स्वस्त झाले आहेत. यानुसार, मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी प्रतिलिटर 83.92 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 76.57 रुपये मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्लीतही पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 7 पैशांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर दर 78.42 रुपये तर डिझेलची किंमत 73.07 रुपये एवढी आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घट होत आहे.
( इंधन दरात घट; पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त )
Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.42 per litre (decrease by Rs 0.14) and Rs 73.07 per litre (decrease by Rs 0.9), respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 83.92 per litre (decrease by Rs 0.14) and Rs 76.57 per litre (decrease by Rs 0.10), respectively. pic.twitter.com/d7pahJGtWy
— ANI (@ANI) November 6, 2018
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.