मुंबई : पेट्रोल आणि डिङोलवर आकारण्यात येणारा लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी), स्टेट स्पेसिफिक कॉस्ट (एसएससी) आणि व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या मागण्या पूर्ण केल्यास राज्यातील वाहनचालकांसाठी पेट्रोलचे दर 5 ते 6 रुपयांनी कमी होतील, असा दावाही फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन या पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेने केला आहे.