इंधन दरात सलग सहाव्या दिवशी कपात; पेट्रोल 10, तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:50 AM2018-10-23T06:50:50+5:302018-10-23T06:58:02+5:30
सहा दिवसांंमध्ये पेट्रोलचा दर दीड रुपयांनी घटला
मुंबई: सलग सहाव्या दिवशी इंधनाच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 10 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना पेट्रोलसाठी 86.81 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 8 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपयांवर आला आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
Petrol & diesel prices in #Delhi are Rs 81.34 per litre (decrease by Rs 0.10) and Rs 74.85 per litre (decrease by Rs 0.07), respectively. Petrol & diesel prices in #Mumbai are Rs 86.81 per litre (decrease by Rs 0.10) and Rs 78.46 per litre (decrease by Rs 0.08), respectively. pic.twitter.com/LfD8i8Wzyh
— ANI (@ANI) October 23, 2018
राजधानी दिल्लीतही इंधनाच्या दरात कपात झाली आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी दिल्लीकरांना 81.34 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 74.85 रुपयांवर आला आहे. 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत घट होत आहे. 17 ऑक्टोबर रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. यानंतर 18 ऑक्टोबरला पेट्रोलच्या दरात घट झाली. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 1.48 रुपयांची घट झाली आहे.
डिझेलच्या दरातदेखील सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही 17 ऑक्टोबरला कोणताही बदल झाला नव्हता. मात्र त्यानंतर डिझेलच्या दरात सतत कपात होत आहे. 18 ऑक्टोबरपासून आजपर्यंत डिझेलच्या दरात 88 पैशांची घट झाली आहे. गेल्या महिन्यात इंधनाचे दर सतत वाढत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तर राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलनं नव्वदी ओलांडली होती. देशभरातही इंधनाच्या किमती भडकल्या होत्या. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त होती. यानंतर वाढता जनक्षोभ लक्षात घेता 4 ऑक्टोबरला केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात केली. मात्र त्यानंतरही पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत होते. मात्र गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होत असल्यानं सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.