Join us

पेट्रोल 35 तर डिझेल 25 रुपयांनी मिळायला हवं, इंधन दरवाढीवरुन भडकले 'नाना'

By महेश गलांडे | Published: February 15, 2021 10:07 PM

पेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले.

ठळक मुद्देपेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले.

मुंबई : इंधनाचे दर शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने प्रतिलिटर ९५ रुपयांचा टप्पा पार केला. तर, डिझेलचे भाव ८५ रुपयांच्या घरात पोहोचले. शहरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज आपला पूर्वीचा उच्चांक मोडत आहेत. शहरात २० नोव्हेंबर-२०२० पासून इंधनाच्या भावाचा घोडा उधळू लागला आहे, त्याला अद्यापही लगाम बसला नाही. त्यावरुन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, पेट्रोल केवळ 35 रुपये लिटर आणि डिझेल 25 रुपये लिटर या भावात मिळायला हवे, असेही पटोले यांनी म्हटले. 

पेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. आंतरराष्ट्रीय बाजारात २०१३ साली क्रूड ऑईलची किंमत १४० डॉलरच्या घरात गेली होती. त्यावेळी पेट्रोलचा भाव उच्चांकी ९३ रुपयांवर गेला होता. तर, डिझेलचा या पूर्वीचा उच्चांक ७८ रुपये प्रतिलिटर होता. या उच्चांकी भावाचे आकडे केव्हाच मागे पडले आहेत. त्यामुळे, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले यांनीही मोदी सरकारवर इंधन दरवाढीच्या निषेधार्ध टीका केली. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली येतायत ते पाहता किंमती कमी करून डिझेल २५ रुपये आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे होते, पण आता पेट्रोलचा दर १०० च्या वर गेला आहे. याचा अर्थ गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला जातोय आणि मूठभर उद्योगपती मित्रांना फायदे पुरवले जातायत. भाजप याच पद्धतीने काम करेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. तसेच, ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही मोदी चले जावचा नारा दिला, पण त्याचा विरोध भाजप आणि मोदी भक्तांनी केला नाही. कारण, आता त्यांनाही वाटतंय की, मोदी सरकार देशाला बरबाद करायला लागले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको आहेत, असेह पटोले यांनी म्हटले. 

तीन महिन्यात पेट्रोल साडेआठ, डिझेल नऊ रुपयांनी महागले

गेल्या तीन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या भावात प्रतिलिटरमागे ७.४३ आणि डिझेलच्या भावात ८.९७ रुपयांनी वाढ झाली. शहरात २० नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८७.६७ रुपये होता. तर, डिझेलचा भाव ७५.७१ रुपये प्रतिलिटर होता. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने ९५.१० आणि डिझेलने ८४.६८ रुपयांवर झेप घेतली.

टॅग्स :नाना पटोलेनरेंद्र मोदीपेट्रोलडिझेल