Join us

फिल्मसिटीतील कॅमेरामनच्या पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:16 AM

फिल्मसिटीमध्ये कॅमेरामन मनोज गोयल याची पत्नी नीलिमा गोयल (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

मुंबई : फिल्मसिटीमध्ये कॅमेरामन मनोज गोयल याची पत्नी नीलिमा गोयल (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मनोज गोयल पत्नीसमवेत कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील अलिकानगरच्या २०४ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहातात. शनिवारी घरी कोणी नसताना, नीलिमा यांनी बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. घरातील मंडळी परतल्यानंतर रात्री हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे़ याप्रकरणी काही जणांची चौकशी केली जाण्याची शक्यात आहे़