फार्मासिस्टचे काळ्या फिती बांधून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:22 AM2018-09-22T06:22:24+5:302018-09-22T06:22:34+5:30
ई-फार्मसीविरोधात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून शुक्रवारपासून २८ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई : ई-फार्मसीविरोधात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून शुक्रवारपासून २८ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाचा आॅनलाइन फार्मसीचा मसुदा आणि आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने केलेल्या अनुभवी औषध विक्रेत्या साहाय्यकांना फार्मासिस्टचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून चुकीच्या औषधांची विक्री, बंदी असलेल्या औषधांची विक्री, गर्भपाताची औषधे, नशेच्या औषधांची सर्रास विक्री असे वेगवेगळे गंभीर प्रश्न समोर उभे राहू शकतात. त्यामुळे आॅनलाइन फार्मसीला सरकारने मान्यता देऊ नये, अशी मागणी सातत्याने असोसिएशन करत आहे. याशिवाय, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने राज्यात फार्मासिस्टचा तुटवडा असल्याचे भासवून पाच वर्षांचा अनुभव असणाऱ्या औषध विक्रेत्यांना फार्मासिस्टचा दर्जा देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. या मागणीलाही विरोध असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले.