फार्मसी फॉर्मात, अभियांत्रिकी कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:25+5:302020-12-24T04:07:25+5:30

अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमेतत १४ हजार जागांची घट; फार्मसीच्या प्रवेश क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ सीमा महांगडे मुंबई : कोरोनामुळे ...

In pharmacy form, in engineering coma | फार्मसी फॉर्मात, अभियांत्रिकी कोमात

फार्मसी फॉर्मात, अभियांत्रिकी कोमात

Next

अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमेतत १४ हजार जागांची घट; फार्मसीच्या प्रवेश क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ

सीमा महांगडे

मुंबई : कोरोनामुळे औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची संधी यातून फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र)च्या प्रवेशासाठी असणाऱ्या प्रवेश क्षमतेमध्ये यंदा मागील वर्षीपेक्षा २,५०० जागांची वाढ झाली, तर दुसरीकडे कुशल रोजगार व रोजगाराची हमी नसल्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत तब्बल १४ हजार जागांची घट झाली.

सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी त्यासाठीची नोंदणी झाली आहे. शासनाकडून एसईबीसी (मराठा आरक्षण) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेशास परवानगी दिल्यानंतर, आता लवकरच या प्रक्रिया सुरू केल्या जातील, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त सी.डी. जोशी यांनी दिली.

२०१९- २० या शैक्षणिक वर्षाशी तुलना केली असता, यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध संस्थांमध्ये १०ची घट झाली असून, त्यामुळे त्याचा परिणाम प्रवेश क्षमतेवर झाला. प्रवेश देणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये घट झाल्यामुळे प्रवेश क्षमतेमध्ये १४ हजार ७ जागा कमी झाल्या असून, प्रवेशासाठी १ लाख ३० हजार २ जागा उपलब्ध आहेत. यंदा फार्मसीच्या शैक्षणिक संस्थेमध्ये २७ शैक्षणिक संस्थांची वाढ झाली असून, राज्यातील शैक्षणिक संस्थांची संख्या ३१९ इतकी झाली आहे. यामुळे फार्मसीच्या प्रवेश क्षमतेत २ हजार ५०९ जागांची वाढ झाली असून, प्रवेश क्षमता २६ हजार ९९५ झाली आहे.

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेश क्षमतेतही २,५१९ जागांची घट होऊन प्रवेश क्षमता १२,४५० तर फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत ६९ जागांची वाढ झाली असून, प्रवेश क्षमता ३,४५५ झाली आहे.

* म्हणून वाढला फार्मसीकडे कल

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, यंदा त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. कोविड १९ मुळे आरोग्य विषयाला महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने औषध, उपचार पद्धतीचाही विचार केला जात. यात औषधनिर्माण व त्यांचे वितरण यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना महत्त्व आहे. आयटी कंपन्यांमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी आहे, तसेच संशोधन क्षेत्रात काम करता येऊ शकते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फार्मसीकडे कल वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

* यंदाच्या प्रवेश क्षमतेची मागील वर्षाशी केलेली तुलना

अभ्यासक्रम - २०१९-२० २०२०-२१

शैक्षणिक संस्था - प्रवेश क्षमता शैक्षणिक संस्था -प्रवेश क्षमता

बीई / बीटेक ३४०- १,४४, ००९ ३०- १,३०, ००२

एमई/ एमटेक २०६- १४९६९ १९६- १२४५०

बी फार्मसी २९२-२४४८६ ३१९-२६९९५

एम फार्मसी १०७- ३३८६ ११३-३४५५

...............................

Web Title: In pharmacy form, in engineering coma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.