मुंबई : कोरोनामुळे औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व व रोजगाराची संधी यातून फार्मसीच्या (औषधनिर्माणशास्त्र) प्रवेश क्षमतेमध्ये यंदा गेल्या वर्षीपेक्षा २,५०० जागांची वाढ झाली, तर रोजगाराची हमी नसल्याने अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमतेत १४ हजार जागांची घट झाली.सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेश सुरू झाले नसले, तरी त्याची नोंदणी झाली आहे. शासनाकडून एसईबीसी (मराठा आरक्षण) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेशास परवानगी दिल्यानंतर, आता लवकरच या प्रक्रिया सुरू केल्या जातील, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त सी.डी. जोशी यांनी दिली. २०१९- २० या शैक्षणिक वर्षाशी तुलना केली असता, यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध संस्थांमध्ये १०ची घट झाली असून, त्यामुळे प्रवेश क्षमतेमध्ये १४ हजार ७ जागा कमी झाल्या असून, प्रवेशासाठी १ लाख ३० हजार २ जागा उपलब्ध आहेत. यंदा फार्मसीच्या शैक्षणिक संस्थेमध्ये २७ शैक्षणिक संस्थांची वाढ झाली असून, राज्यातील शैक्षणिक संस्थांची संख्या ३१९ इतकी झाली आहे. यामुळे फार्मसीच्या प्रवेश क्षमतेत २ हजार ५०९ जागांची वाढ झाली असून, प्रवेश क्षमता २६ हजार ९९५ झाली आहे.अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेश क्षमतेतही २,५१९ जागांची घट होऊन प्रवेश क्षमता १२,४५० तर फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत ६९ जागांची वाढ झाली असून, प्रवेश क्षमता ३,४५५ झाली आहे.
यंदाच्या प्रवेश क्षमतेची मागील वर्षाशी केलेली तुलनाअभ्यासक्रम २०१९-२० २०२०-२१ शैक्षणिक प्रवेश शैक्षणिक प्रवेश संस्था क्षमता संस्था क्षमताबीई / बीटेक ३४० १,४४,००९ ३० १,३०,००२एमई/ एमटेक २०६ १४९६९ १९६ १२४५०बी फार्मसी २९२ २४४८६ ३१९ २६९९५एम फार्मसी १०७ ३३८६ ११३ ३४५५
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, यंदा त्यात आणखी वाढ झाली आहे.