मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ अंतर्गत कृष्णा-१ या टनेल बोरिंग मशीनद्वारे सिद्धिविनायक ते दादर हा १.१२ किमी लांब ३५वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
७ जुलै २०२० रोजी या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. या भुयारीकरणासह पॅकेज - ४चे एकूण १०.९६ किमी लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी ३ टनेल बोरिंग मशीन कार्यरत होत्या, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे देण्यात आली.
दुसरीकडे दादर मेट्रो स्थानकाचे जवळपास ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता एकूण ७ पैकी ४ पॅकेजेसमध्ये भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे.
-------------------
भुयारीकरण आव्हानात्मक काम आहे. शहराचे मुख्य केंद्र मानले जाणारे दादर, मेट्रो - ३ द्वारे जोडले जाईल. मुंबईकरांच्या अडचणी कमी होतील.
- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
-------------------
पॅकेज - ४
दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी या स्थानकांचा समावेश आहे.
८ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण करण्यात आले.
नयानगर ते धारावी (अपलाइन – ५८९ मी. आणि डाउनलाइन – ५८९ मी.)
नयानगर ते दादर (अपलाइन – २४९१ मी. आणि डाउनलाइन - २४७२ मी.)
सिद्धिविनायक ते दादर (अपलाइन - ११०६ मी. आणि डाउनलाइन – ११२६ मी.)
सिद्धिविनायक ते वरळी (अपलाइन - १३०५ मी. आणि डाउनलाइन - १२८४ मी.)