Eknath Shinde: बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघेंचाही फोटो! असं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 11:37 AM2022-07-07T11:37:25+5:302022-07-07T11:38:34+5:30

Eknath Shinde: नव्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आले आहेत.

Photo of Dharmaveer Anand Dighe with Balasaheb Thackeray! This is the hall of Chief Minister Eknath Shinde | Eknath Shinde: बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघेंचाही फोटो! असं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन

Eknath Shinde: बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघेंचाही फोटो! असं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन

googlenewsNext

मुंबई -  मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांसाठी कार्यालयात काही बदल करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नव्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आले आहेत.

नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती.  तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे पदभार स्वीकारतील. दरम्यान, आपल्या दालनात बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावत एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

जून महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले होते. तर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ३० जून रोजी झालेल्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. 

Web Title: Photo of Dharmaveer Anand Dighe with Balasaheb Thackeray! This is the hall of Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.