क्रेडिट कार्डच्या थकबाकीला कंटाळून छायाचित्रकाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:13+5:302021-07-30T04:06:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवली परिसरात बुधवारी संध्याकाळी निखिल खेडेकर (२१) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या ...

Photographer commits suicide due to credit card arrears | क्रेडिट कार्डच्या थकबाकीला कंटाळून छायाचित्रकाराची आत्महत्या

क्रेडिट कार्डच्या थकबाकीला कंटाळून छायाचित्रकाराची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवली परिसरात बुधवारी संध्याकाळी निखिल खेडेकर (२१) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. तो व्यवसायाने छायाचित्रकार असून, क्रेडिट कार्डच्या कर्जाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे.

खेडेकर हा कांदिवली पश्चिमच्या लालजीपाडा परिसरात असलेल्या गणेश या एसआरए इमारतीत कुटुंबासोबत राहत होता. त्याला फोटोग्राफीची आवड होती. खेडेकर याने बुधवारी त्याच्या प्रेयसीला फोन करुन तो आत्महत्या करत असल्याचे कळवले. त्यानंतर तिने त्याच्या मित्रांना याची माहिती दिली. त्यामुळे वडिलांनी जाऊन त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, तेव्हा खेडेकरने आतून कडी लावली होती. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांनी मुलाला पाहिले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येत त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवत मित्र तसेच कुटुंबीयांचा जबाब नोंदविण्यास सुरूवात केली. खेडेकरला क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय होती. त्यातूनच त्याला बरेच कर्ज झाले होते. यासाठी त्याला बँकेकडून नोटीसही आल्या होत्या. त्यामुळे त्याच विवंचनेत त्याने हे पाऊल उचलले असावे, असा जबाब वडिलांनी पोलिसांना दिल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.

Web Title: Photographer commits suicide due to credit card arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.