वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो आता होणार गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:10 AM2019-01-20T06:10:50+5:302019-01-20T06:11:03+5:30

महावितरणकडून वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते.

Photos of meter reading on electricity bill will now disappear | वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो आता होणार गायब

वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो आता होणार गायब

Next

मुंबई : महावितरणकडून वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. छापील वीजबिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती त्यांना मिळत असल्यामुळे आता १ फेब्रुवारीपासून महावितरणने वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रीडिंगचा फोटो प्रसिद्ध करण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा महातिवरणसह ग्राहकांनाही पारदर्शक वीज बिलासाठी उपयोग होत आहे. याच्या पुढचे पाऊल म्हणून डिजिटल युगाशी जुळवून घेत आता महावितरणकडून ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबिल मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंग घेतल्यानंतर त्याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रीडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होते. तसेच मीटर रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होते. अशा प्रकारे छापील बिल मिळण्यापूर्वीच ग्राहकांना मीटर रीडिंग समजत असल्यामुळे आता यापुढे वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
सध्या महावितरणकडे २ कोटी ५० लाख वीजग्राहक आहेत. यापैकी सुमारे दोन कोटी सात लाखांहून अधिक ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. ज्यांनी मोबाइलची नोंदणी केलेली नाही त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
।‘त्या’ जागी मिळणार बिलासंबंधी पूरक माहिती
डिजिटल युगाशी जुळवून घेत तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वीज ग्राहकांच्या मोबाइलवर छापील वीज बिल देण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. वीज ग्राहकांकडे मोबाइल असल्याचे गृहित धरूनच मीटर रीडिंगचा फोटो वीज बिलावर प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही मोबाइल नसलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना त्या-त्या महिन्यातील मीटरचा फोटो महावितरणच्या ६६६.ेंँ्िर२ूङ्मे.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच बिलावर मीटरचा फोटो प्रसिद्ध न केल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पूरक माहिती देण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Photos of meter reading on electricity bill will now disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.