- शेफाली परब-पंडित मुंबई : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या काही दिवसांतच जाहीर होणार असल्याने सत्ताधारी शिवसेनेने विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धुमधडाका सुरू केला आहे. पहारेकऱ्यांबरोबर सूर जुळल्यामुळे एकाच दिवशी दोन-तीन कार्यक्रमांचा बार उडवून देण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीत काही नगरसेवकही आपले नशीब आजमावत असतात. शिवसेनेचे नगरसेवक राहुल शेवाळे हे थेट खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे आपल्या विभागातील विकास कामे लवकर मार्गी लावण्यासाठी काही ज्येष्ठ नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करून श्रेय आपल्या खिशात घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात पालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाच्या परळ येथील ‘शहर आपत्ती व्यवस्थापन संस्था व संशोधन केंद्रा’चे व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बेस्ट उपक्रमाच्यावीज ग्राहक सुविधा केंद्राचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. तर उद्या एकाच दिवशी भायखळा, राणीबागेतील विविध नवीन प्रकल्प आणि आश्रय योजने अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान वाटप करण्यात येणार आहे.>असे आहेत बुधवारचे कार्यक्रम...मुंबईतील सर्वात मोठा गांडुळखत प्रकल्प सुमारे २०००चौ.मी. क्षेत्रावर वकसित करण्यात आला आहे. प्राण्यांच्या पिंजऱ्यांचे लोकार्पण - काकर (६५७.५२ चौ.मी.), सांबर पिंजरा - (३१७३.२६ चौ.मी.), चितळ पिंजरा - (१७६८.६९ चौ.मी.)प्राण्यांकरिता किचन कॉम्लेक्स प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी खाद्य स्वच्छ करुन वेगवेगळया भागात तयार करण्याकरिता ओटा, मिश्रणटाक्या, डीप फ्रीजर, इ. नी सुसज्ज असलेले किचन कॉम्लेक्स तयार करण्यात आले आहेत.क्वारंटाईन क्षेत्र (वाघ, सिंह, बिबटया या प्राण्यांकरिता) - नवीन येणाºया वाघ, सिंह, बिबटया या प्राण्यांकरिता क्वारंटाईन क्षेत्र तयार करण्यात आले आहे.नवीन थ्रीडी थिएटर २०५ आसनक्षमता असलेले नवीन थ्रीडी थिएटर, पब्लिक अॅड्रेस सिस्टिम व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा - प्राणिसंग्रहालय परिसरात विविध ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे २०० सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले आहे.आश्रय योजनेअंतर्गत सफाई कर्मचाºयांना सेवा निवासस्थानाचे वाटप कोचीन स्ट्रीट, फोर्ट येथे करण्यात येणार आहे.
आचारसंहितेपूर्वी प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धूमधडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:36 AM