लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट

By admin | Published: October 1, 2014 02:38 AM2014-10-01T02:38:29+5:302014-10-01T02:38:29+5:30

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 1 ऑक्टोबर (बुधवारी) शेवटचा दिवस आहे.

The picture of the fight will be clear today | लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट

लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट

Next
>मुंबई/ ठाणो  : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 1 ऑक्टोबर (बुधवारी) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच किती जोरदार चुरस निर्माण होईल, याबाबतचे चित्र 
स्पष्ट होणार आहे. दरम्यान, 
मंगळवारी मुंबई ठाण्यातील अनेक उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे. 
मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्ह्यात 1क् विधानसभा मतदारसंघांतून दाखल झालेल्या 191 अर्जापैकी 26 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 165 उमेदवार पात्र ठरले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 27 सप्टेंबर्पयत राजकीय पक्षांच्या एकूण 5क्4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 29 सप्टेंबर रोजी 76 जणांचे अर्ज अपात्र ठरले. आणि आता 428 उमेदवार पात्र ठरले आहेत. दरम्यान, बाद झालेल्या उमेदवारांमध्ये चांदिवली विधानसभेतील भाजपाचे उमेदवार सीताराम तिवारी यांचा समावेश आहे, तर भायखळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कुलदीप पेडणोकर यांचा अर्ज बाद झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसेने स्वतंत्र चूल मांडल्याने कशी चुरस रंगणार याविषयी औत्सुक्य आहे. 
ठाणो जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून 382 उमेदवारांनी 415 अर्ज भरले होते. मात्र, छाननीत 84 अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये मीरा-भाईंदर मतदारसंघात सर्वाधिक 18 अर्ज अवैध ठरले असून अंबरनाथ मतदारसंघात एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. 
15 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून 1 ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तत्पूर्वीच मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणारे खान सिंकदर मुमताज अहमद यांनी, बेलापुरातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे मारुती नागा भोईर तसेच ऐरोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सीताराम सावळे आणि रवींद्र काशिनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक अधिका:यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
ठाणो जिल्ह्यातून चार उमेदवारांची माघार : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणा:या चार उमेदवारांनी आपले अर्ज मंगळवारी 
मागे घेतले. हे चारही उमेदवार अपक्ष असून, त्यामध्ये ऐरोली मतदारसंघातील दोघांचा समावेश आहे.

Web Title: The picture of the fight will be clear today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.