चित्रांनी बदलला शिवडी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:59+5:302021-02-23T04:07:59+5:30

मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकातील घाणीचे साम्राज्य दूर करत चित्रांच्या माध्यमातून या स्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे. हार्बर रेल्वे ...

Pictures changed the face of Shivdi railway station | चित्रांनी बदलला शिवडी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा

चित्रांनी बदलला शिवडी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा

Next

मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकातील घाणीचे साम्राज्य दूर करत चित्रांच्या माध्यमातून या स्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी स्थानकाच्या भिंती आणि परिसरात घाणीचे साम्राज्य होते. याशिवाय प्रवाशांवर नियंत्रण नसल्याने पादचारी मार्ग आणि स्थानकावर थुंकण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे जागोजागी घाण दिसत होती. मात्र, सिन्हा यांनी लॉकडाऊनपूर्वीच शिवडी रेल्वे स्थानकाची स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली. सिन्हा यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्थानकाचा कायापालट केला आहे.

सिन्हा म्हणाले की, मी यापूर्वी किंग सर्कल येथे स्टेशन मास्तर होतो. मी ऑक्सिजनसाठी लढत होतो. कोणालाही काळजी नव्हती. मे २०१३ ला त्याबाबत वृत्त आले, त्यानंतर मी चर्चेत आलो. पंतप्रधानांनी डिसेंबर २०१४ मध्ये किंग सर्कल स्थानकाचे नाव घेतले. ते स्थानक ऑल इंडिया रँकमध्ये दुसरे आले होते.

शिवडी रेल्वे स्थानकातील भिंतीवर विविध संदेश देणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. स्थानकाची दैनंदिन साफसफाई केली जात आहे. पादचारी मार्गावरील पायऱ्यांनाही विविध चित्रांद्वारे रंगवण्यात आले आहे. भिंतीवर वारली चित्र प्रवाशांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे, तर रेल्वे परिसरात थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांनाही शिस्त लागली आहे.

शिवडी रेल्वे स्थानकात बदली झाडे लावण्यास, स्वच्छता करण्यास सुरुवात केली. त्याकरिता रोटरी क्लब आणि लायन्स क्लब संस्थांची मदत झाली. आता शिवडी मुंबईतील स्वच्छ स्थानकांपैकी एक आहे. डीआरएम यांनी शिल्ड देऊन गौरविले आहे. पूर्वी माशांचा दुर्गंध येत होता; पण आता दुर्गंध येत नाही. रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी स्वच्छता आहे.

एन. के. सिन्हा, स्टेशनमास्तर सिन्हा

Web Title: Pictures changed the face of Shivdi railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.