प्रतिकूल परिस्थितीतून साकारली चित्रे

By admin | Published: October 19, 2015 01:16 AM2015-10-19T01:16:15+5:302015-10-19T01:16:15+5:30

चित्रकलेच्या प्रशिक्षणाशिवाय, कोणाचाही वरदहस्त डोक्यावर नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अद्भुत चित्रे, कोल्हापूरच्या पोखले गावातील चित्रकार रणजीतसिंह पाटील यांनी कॅनव्हॉसवर रेखाटली आहेत

Pictures originated from adverse conditions | प्रतिकूल परिस्थितीतून साकारली चित्रे

प्रतिकूल परिस्थितीतून साकारली चित्रे

Next

मुंबई : चित्रकलेच्या प्रशिक्षणाशिवाय, कोणाचाही वरदहस्त डोक्यावर नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अद्भुत चित्रे, कोल्हापूरच्या पोखले गावातील चित्रकार रणजीतसिंह पाटील यांनी कॅनव्हॉसवर रेखाटली आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रणजीतसिंह यांना त्यांची चित्रे घराघरांत पोहोचवायची आहेत. त्यांच्या या अनोख्या चित्रांंचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथे १८ आॅक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुले आहे.
वयाच्या पाचव्या वर्षापासून चित्रकलेची आवड असलेल्या रणजीतसिंह यांनी शाळेतल्या कलाशिक्षकांचे रेखाचित्र काढले व त्याला शिक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप त्यांना या क्षेत्राकडे वळण्यास उद्युक्त करणारी ठरली. एक चित्र साकारताना, त्यासाठी खूप वेळ व पैसा खर्च करावा लागतो. मात्र, ते चित्र विकण्यास फार संयम बाळगावा लागतो, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
रंगरेषांचा अचूक पोत, हुबेहूब जीवंतपणा ही त्यांच्या चित्रांची वैशिट्ये आहेत. ही चित्रे रसिकांना भुरळ पाडत आहेत. या प्रदर्शनात पोर्ट्रे$ट आणि निसर्गचित्रे अशी तब्बल ४५ चित्रे आहेत. हत्तींचा कळप, ताजमहालासमोरून जाणारा उंटांचा तांडा, दीप उजळवताना दोन स्त्रिया, तसेच कोल्हापूरचे खरे वैभव असलेली अंबाबाई, शाहू महाराज यांची आकर्षक पोर्ट्रेट प्रदर्शनात पाहता येतील. ‘मी इतरांची चित्रे पाहत शिकलो. यातूनच स्वत:चेही असे प्रदर्शन भरवावे, ही इच्छा निर्माण झाली. २०१३ साली पहिले प्रदर्शन भरवले. त्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर हे दुसरे प्रदर्शन भरवले आहे. यासाठी दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे,’ असे रणजीतसिंह म्हणाले.

Web Title: Pictures originated from adverse conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.