- सचिन लुंगसेमुंबई : २६ जुलै रोजी २४ तासांत मुंबईत झालेल्या ९४४ मिलीमीटर विक्रमी पावसाने, त्याच दिवशी समुद्राला भरती असल्याने ४.४८ मीटर उंचीच्या लाटांनी मुंबईला वेढले आणि महापूर आलेल्या मिठी नदीने मुंबईला पाण्याखाली नेले. आज या घटनेस कित्येक वर्षे झाली असली तरी देखील आजही थोडा तरी मोठा पाऊस आला, समुद्राला भरती आली की मिठी काठी राहत असलेल्या रहिवाशांना धडकी भरत आहे. कारण मिठी नदीच्या पात्रात ठिकठिकाणी गाळ भरला असून, नदी वाहती नाही. परिणामी पुराचे पाणी घरात शिरत असून, मिठीच्या नावाने स्वच्छतेचे उपक्रम राबवित असलेल्या सरकारच्या शुक्रवारच्या स्वच्छता प्रकल्पाने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांच्या म्हणण्यानुसार, २६ जुलै रोजी मिठी नदीला पूर आल्यानंतर मिठी नदी विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. आजपर्यंत यांच्या बैठकादेखील नीट झालेल्या नाहीत. आजपर्यंत नदीवर हजार करोड रुपये खर्च झाले. मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी मशीन बसविण्यात आली ही चांगली गोष्ट आहे. . मात्र एकाच ठिकाणी असा प्रकल्प राबवून फायदा होणार नाही. समुद्रात घनकचरा जाऊ नये यासाठी मुंबईतल्या चारही म्हणजे ओशिवरा, दहिसर, पोईसर आणि मिठी नदीवर काम केले पाहिजे. आता तुम्ही मिठी नदीवर काम केले; मात्र उरलेल्या तीन नद्यांतून समुद्रात कचरा जाणारच आहे. शिवाय नाले आहेत. हे नाले नद्यांना येऊन मिळतात. परिणामी पहिल्यांदा नदीकाठच्या नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे.चारही नद्यांवर स्वच्छता प्रकल्प हाती घ्या. सांडपाणी मिठी नदीत जाणार याची काळजी घेतली पाहिजे. मलजल मिठी नदीत जाणार नाही यासाठी काम केले पाहिजे. असे अनेक उपाय केले तर प्रदूषण होणार नाही. मिठी स्वच्छ करायची असेल तर सर्व घटकांना प्राधान्य दिले पाहिजे. स्वच्छता प्रकल्पासाठी मशीन लावणे म्हणजे एक प्रकारचे गाजर दाखविल्यासारखेच आहे, असेदेखील गॉडफ्रे पिमेंटा यांनी नमूद केले.एमएमआरडीए म्हणते; कामे पार पडलीराज्य शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ संस्था आणि समितीच्या शिफारसीनुसार अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, खडक खोदाई, संरक्षक भिंत, सर्व्हिस रोड आणि सुशोभीकरणाची कामे पार पडली आहेत. बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मिठी नदीच्या वाहन क्षमतेमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. याच बरोबर अंमलबजावणी करणाऱ्या संस्था देखील नदी साफ करण्याचे काम करत आहेत.सामंजस्य करारमिठी नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मरीन डेब्रिज पार्टनरशिप यांच्यात ३ सप्टेंबर २०२० रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता.फिनलँड आणि मिठीबूम, कॉन्सन्टेटर आणि रिकव्हरी युनिट असलेली फ्लोटिंग मटेरियल गोळा करण्याची साधने रिव्हर रिसायकलद्वारा फिनलँडच्या हेलसिंकी येथे तयार करण्यात आली.साइट चाचण्या४ जानेवारी २०२१ रोजी ही साधने भारतात पोहचली. प्रकल्पस्थळाची निवड करताना सर्व ठिकाणे, साइट चाचण्या आणि विश्लेषण केल्यानंतर वाकोला ब्रीज (मिनी संगम) जवळ उपकरण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रिव्हर रिसायकलमिठी नदी स्वच्छता प्रकल्पात रिव्हर रिसायकल ही संस्था नदीच्या सफाईसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान,समुद्रातून नदीत प्रवेश करणारे प्लास्टिक आणि तरंगणारा कचरा थांबविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरवित आहे.तीन टप्पेनदीतील गाळ काढणेतरंगता कचरा वेगळा करणेआजूबाजूच्या परिसरातून येणारे घाण पाणी रोखणेमिठी नदीचा उगम विहार आणि पवई जलाशयाच्या प्रवाहातून होतो.मिठी नदीची लांबी १७.८४किलोमीटर आहे.मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीच्या खालून वाहते. नंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते.मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर आहे.मिठी नदी उगमस्थानी समुद्र सपाटीपासून २४६ मीटर उंच आहे.मिठी नदीचा ११.८४ किलोमीटर लांबीचा भाग मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तर ६ किलोमीटर लांबीचा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे.मागील काही वर्षांत मिठी नदीला नाल्याचे स्वरूप आले.पावसाळ्यात नागरी वस्तीला धोका निर्माण झाला.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळेकिनाऱ्यावरील नागरिकांचेस्थलांतर करावे लागले.मिठी नदीची स्वच्छता हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहे.मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी...गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून मिठीला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी नाल्याचे स्वरूप आलेल्या मिठीला पुन्हा नदीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे.- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्रीदरवर्षी गाळदरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्यात येत असून महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक बाबी करीत राहील. - किशोरी पेडणेकर, महापौरपुनरुज्जीवन नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एमएमआरडीए आपल्यामार्फत सर्व ते प्रयत्न करील.- श्रीनिवास, आयुक्त, एमएमआरडीए
मिठीला स्वच्छतेचे गाजर; नाल्याची नदी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:24 AM