Join us  

अंधेरीत पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By रतींद्र नाईक | Published: August 23, 2023 8:52 PM

दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून या विभागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरातील आदर्श नगर जवळ पालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास फुटली. या घटनेनंतर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती कार्य हाती घेतले.

अंधेरीतील आदर्श नगर मार्ग, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी असून ही जलवाहिनी फुटली त्यामुळे  लाखो लिटर पाणी वाया गेले इतकेच नव्हे तर लोखंडवाला संकुल, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. जलअभियंता विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक ते दुरुस्ती कार्य युद्धपातळीवर हाती घेतले व जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा  तात्काळ बंद करुन पाणी गळती थांबवली. दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून या विभागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :पाणीकपात