मुंबई
मुंबईतील वांद्रे पूर्व येथे मनपाची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. पण याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं असून पाइपलाइन फुटीची कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे. वांद्रे पूर्व येथे जलवाहिनी देखभालीचे काम सहाय्यक अभियंत्यांच्या देखरेखीखाली सुरू होते. त्यावेळी पाण्याचं प्रेशर तपासण्यासाठी वॉल्व्ह सुरू करण्यात आला होता, असं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
वांद्रे पूर्व येथे पश्चिम द्रूतगती महामार्गाच्या जवळच असलेल्या पाइपलाइनच्या ठिकाणी हे काम सुरू होतं. सदर ठिकाणी कोणतीही जलवाहिनी फुटलेली नाही आणि देखभाल दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे, असे पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.