मुलुंडमध्ये पाइपलाइन फुटली
By Admin | Published: November 11, 2014 01:01 AM2014-11-11T01:01:32+5:302014-11-11T01:01:32+5:30
मुलुंड पश्चिमेकडे पाणीपुरवठा करणारी 6क्क् मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने मुलुंडकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावल्याची घटना सोमवारी घडली.
मुलुंड : मुलुंड पश्चिमेकडे पाणीपुरवठा करणारी 6क्क् मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने मुलुंडकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे मुलुंडकरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले.
मुलुंड टी वॉर्डलगत असलेली पाइपलाइन सकाळी पाचच्या सुमारास फुटली. या पाइपलाइनद्वारे मुलुंड पश्चिमेकडील स्टेशन परिसर, तांबे नगर, अशोक नगर, डम्पिंग रोड, सवरेदय नगर, गोशाळा रोड, पी.के. रोड, मुलुंड कॉलनी, अमरनगर खिंडीपाडासहित मुलुंड पश्चिमेकडील लाखो रहिवाशांना पाणीपुरवठा
होतो. सकाळी पाच वाजल्यापासून अचानक पाणीपुरवठा बंद
झाल्याने मुलुंडकरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात डेंग्यूच्या भीतीने बहुतेक कुटुंबीयांनी घरात पाणीसाठा ठेवू नये, म्हणून भांडी रिकामी ठेवली होती. अशात चाळीतील रहिवाशांची चांगलीच पंचाईत झाली होती. मुलुंडकरांची सकाळ पाण्याविनाच सुरू झाली. पाणी न येण्याचे कारण माहीत नसल्याने जिथे तिथे पाण्याचीच
चर्चा रंगली होती. तर काही ठिकाणी चक्क पाण्याचे टँकर मागविण्यात आले.
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी असल्याने फुटली. सध्या त्या ठिकाणी नवीन 6क्क् मिमी. व्यासाची पाइपलाइन बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.
मध्यरात्री 2 ते 4 दरम्यान काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतरच मुलुंडकरांसाठी पाणीपुरवठा
पूर्ववत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)