मुंबईतील स्‍मशानभूमींना सवलतीत पाईप गॅस द्या- अ‍ॅड. आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 06:40 PM2018-02-13T18:40:25+5:302018-02-13T18:40:35+5:30

पर्यावरणपूरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्‍मशानभूमींना सवलतीने देण्‍यात यावा, अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्‍याची आज दिल्‍लीत भेट घेऊन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली.

Pipes gas for discount in Cemetery in Mumbai - Adv. Ashish Shelar | मुंबईतील स्‍मशानभूमींना सवलतीत पाईप गॅस द्या- अ‍ॅड. आशिष शेलार

मुंबईतील स्‍मशानभूमींना सवलतीत पाईप गॅस द्या- अ‍ॅड. आशिष शेलार

Next

मुंबई- पर्यावरणपूरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्‍मशानभूमींना सवलतीने देण्‍यात यावा, अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्‍याची आज दिल्‍लीत भेट घेऊन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली.

नॅचरल गॅस हा पर्यावरणपूरक असून स्‍मशानभूमींना तो सवलतीने उपलब्‍ध करून दिल्‍यास लाकडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्‍तल कमी होऊ शकेल. तसेच लाकडाच्‍या जळण्‍यामुळे निर्माण होणारा धूर व त्‍याचे प्रदूषण कमी करण्‍यात मदत होईल. म्‍हणून सवलतीच्‍या दराने पाईप गॅस उपलब्‍ध करून देण्‍यात यावा, अशी मागणी आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी धर्मेद्र प्रधान यांच्‍याकडे केली आहे.

सांताक्रूझ पश्चिम येथे स्‍थानिक नागरिक एकत्र येऊन नॅचरल गॅसवर चालणारी विद्युत दाहिनी उभारून पर्यावरणपूरक स्‍मशानभूमी उभी करण्‍यात आली आहे. या स्‍मशान भूमीलाही सवलतीने गॅस मिळावा अशी विनंती करतानाच अशाच प्रकारे मुंबईतील सर्वच स्‍मशानभूमींमध्‍ये पाईपने गॅस पुरवठा सवलतीने करण्‍यात यावा, अशी मागणी आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

Web Title: Pipes gas for discount in Cemetery in Mumbai - Adv. Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.