पिंपात डासांचे अड्डे, २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 02:49 AM2018-10-06T02:49:50+5:302018-10-06T02:50:18+5:30

पालिकेची पाहणी : २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती

Pippa mosquito base, 28 thousand 162 places dengue production | पिंपात डासांचे अड्डे, २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती

पिंपात डासांचे अड्डे, २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती

googlenewsNext

मुंबई : महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे केलेल्या पाहणीत २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे. यापैकी १४ हजार ९३०; म्हणजेच ५३ टक्के उत्पत्तीस्थाने ही पाणी साठविण्याच्या पिंपात सापडली आहेत. त्यात आॅक्टोबर हीटमुळे हवेतील वाढलेली आर्द्रता व दमटपणामुळे डेंग्यू विषाणूंच्या प्रसारास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती मोहीम हाती घेण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी साहाय्यक आयुक्त व आरोग्य अधिकाºयांना दिले आहेत.

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दरवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते. डेंग्यूचे रुग्ण गेल्या महिन्याभरात वाढले असून सप्टेंबर महिन्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. आयुक्तांनी आरोग्य व कीटकनाशक विभागाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत सूक्ष्मस्तरीय नियोजन, प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, नगरसेवकांचेही मोहिमेस सहकार्य घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. डेंग्यू व मलेरियाविषयक तपासणीसाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिक घरात घेत नाहीत. सहकार्य केले जात नाही. यामुळे डासांचे अड्डे शोधण्याच्या मोहिमेला फटका बसत आहे. त्यामुळे पालिकेचे पथक आल्यास ते आपल्याला मदत करण्यासाठीच आहे, याची जाणीव ठेवून त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशी घ्यावी काळजी

डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. तसेच या डासांच्या पाण्यातील अवस्था या आठ दिवसांच्या असतात.
घरातील पिंप, ड्रम, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलावे. तसेच कोरडी केलेली भांडी स्वच्छ कपड्याने दाब देऊन पुसून घ्यावीत जेणेकरून भांड्यांच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.
आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. त्याचबरोबर पाणी साठविण्याच्या भांड्यांचे तोंड हे स्वच्छ व दुपदरी कपड्याने घट्ट बांधून बंद करून ठेवावे.

सर्वाधिक डास उत्पत्ती ‘ड्रम’मध्ये
डासांच्या आढळून आलेल्या उत्पत्ती स्थानांपैकी सर्वाधिक म्हणजे १४ हजार ९३० ठिकाणे, म्हणजेच ५३.०१ टक्के उत्पत्तीस्थाने ही पाणी साठविण्याच्या ड्रममध्ये आढळून आली. त्याखालोखाल सहा हजार ९६८ म्हणजेच २४.७४ उत्पत्तीस्थाने ही उघड्यावरील करवंट्या, टायर्स, थर्माकोल, प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणे यांसारख्या पाणी साठणाºया वस्तूंमध्ये आढळून आली.

तर याखालोखाल २०.५८ टक्के; म्हणजेच पाच हजार ७९६ उत्पत्तीस्थाने ही भांडे, पत्रे, पत्र्यांची पन्हाळी, बाटल्या इत्यादींमध्ये आढळून आली. तसेच याखालोखाल ८.५५ टक्के ठिकाणेही म्हणजेच दोन हजार ४०८ उत्पत्तीस्थाने ही बांधलेल्या ताडपत्रीमध्ये आढळून आली आहेत.

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान, ९९ लाख ८१ हजार २१९ घरांची व एक कोटी सात लाख आठ हजार ९८४ पाणी साठवण वस्तूंची तपासणी करण्यात आली. २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यू विषाणूंच्या प्रसारास कारणीभूत ठरणाºया ‘एडिस एजिप्ताय’ डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली.

Web Title: Pippa mosquito base, 28 thousand 162 places dengue production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.