‘सैराट’ची पायरेटेड कॉपी व्हायरल!

By admin | Published: May 5, 2016 02:35 AM2016-05-05T02:35:04+5:302016-05-05T02:35:04+5:30

चित्रपट रसिकांच्या मनावर सुसाटपणे पकड घेणाऱ्या सैराट या मराठी चित्रपटाच्या मूळ प्रिंटची पायरेटेड कॉपी व्हायरल झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत कोट्यवधींची विक्रमी कमाई करणाऱ्या

Pirated copy of 'Sarat' viral! | ‘सैराट’ची पायरेटेड कॉपी व्हायरल!

‘सैराट’ची पायरेटेड कॉपी व्हायरल!

Next

मुंबई : चित्रपट रसिकांच्या मनावर सुसाटपणे पकड घेणाऱ्या सैराट या मराठी चित्रपटाच्या मूळ प्रिंटची पायरेटेड कॉपी व्हायरल झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत कोट्यवधींची विक्रमी कमाई करणाऱ्या या चित्रपटाची तीन जीबीची मूळ प्रिंट ‘यू ट्यूब’वर अपलोड करण्यात आली आहे. या पायरसीचा फटका चित्रपटाला बसत आहे. त्यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयात येऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची नागराजने भेट घेतली. चित्रपटाची पायरटेड कॉपी बाजारात आल्यामुळे चित्रपटाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे याबाबत संबंधितांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी विनंती मंजुळे यांनी कुलकर्णी यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)

पायरसीकडे पोलिसांचा काणाडोळा
एकीकडे हाऊसफुल्ल सुरू असलेल्या ‘सैराट’ला पायरसीचा फटका बसलेला आहे. गल्लीबोळापासून लोकल ट्रेनमध्ये ‘सैराट’ची पायरेटेड कॉपी शेअर होत आहे. बुधवारी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला डब्यातही काही महिला सैराट चित्रपटाची कॉपी शेअर करीत असल्याचे एका तरुणीच्या लक्षात आले.
त्यावेळी तरुणीने तत्काळ पोलिसांना फोन केला. मात्र पोलिसांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिला. उलट रेल्वेतून प्रवास करीत असल्याने रेल्वे पोलिसांना फोन करण्याचा अजब सल्ला पोलिसांनी तरुणीला दिला.

तिकिटांचा काळाबाजार, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
१मुंबईसह राज्यभर प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या तिकीटांचा मुंबईतील बहुतेक चित्रपटगृहांबाहेर सर्रासपणे काळाबाजार सुरू आहे. एक पडदा चित्रपटगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांबाहेर दामदुपटीने ‘सैराट’ची तिकिटे ब्लॅक होत आहेत. मात्र या ठिकाणी पोलिसांचा कानाडोळा होत असल्याची तक्रार अभिषेक शिंदे या तरुणाने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
२चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रिंकू राजगुरू हिला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केल्याने चित्रपट जास्तच चर्चेत आला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकवर्गातूनही चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच वीकएण्डला ‘सैराट’ने १२ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली आहे.

लवकरच योग्य ती कारवाई
तिकिटांच्या होत असलेल्या काळ््या बाजारसंदर्भात पोलीस अधिक माहिती घेत असून लवकरच त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांचे प्रवक्ते व पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा धनंजय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

Web Title: Pirated copy of 'Sarat' viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.