उल्हासनगर : शहजादे अन्सारी याला मारहाण करीत डोक्यावर पिस्तूल रोखून लघुशंका पाजल्याचा प्रताप नगरसेवकाच्या मुलाने केला आहे. या प्रकरणी विल्सन, युवराज पाटील यांच्यासह पाच साथीदारांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं. - ५ येथील गाऊन मार्केटमध्ये शहजादे नाफिस अन्सारी (२२) व्यवसाय करतो. जुन्या रागातून नगरसेवकाचा मुलगा युवराज पाटीलने मित्र विल्सनला शहजादेला स्वामी शांतीप्रकाश शाळा येथील कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. कार्यालयात आणल्यानंतर पाटीलने साथीदाराच्या मदतीने लोखंडी रॉडने अन्सारीला मारहाण केली. त्यानंतर कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन डोक्यावर पिस्तूल रोखत लघुशंका पाजली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिललाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी विल्सन, युवराज पाटील यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. शहजादेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी) बदनामीचा प्रयत्ननिवडणुकीपूर्वी बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक विजय पाटील यांनी दिली. पाटील कुटुंबाच्या दशहतीने कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांसह शहजादे याने दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. के. जाधव करीत आहेत.
पिस्तूल रोखत पाजली लघुशंका
By admin | Published: December 31, 2016 2:44 AM