मुंबई : मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली तसेच वांद्रे ते दहिसर, चेंबूर ते सीएसटी या भागामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक वैतागले आहेत.
राकेश दुबे म्हणाले की, सध्या पावसामुळे मुंबईमध्ये खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.पालिका कधी खड्डे बुजवणार हे माहीत नाही; मात्र पालिकेने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. गाडी चालवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
रमेश पुजारी म्हणाले की, सगळीकडे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. माझी दुचाकी परेल रस्त्यावर घसरली, सुदैवाने मला काही झाले नाही.
मोहम्मद अश्रफ कामासाठी दररोज बसने प्रवास करतात. ते म्हणाले की, खड्ड्यांमुळे बसने प्रवास करताना अडचणी येतात.२ ते ३ तास हे प्रवासातच जातात. बसने जाताना दणके बसतात याचा त्रास होतो.