Join us

कळंब पुलावर खड्डेच खड्डे

By admin | Published: July 27, 2014 11:51 PM

मुरबाड रस्त्यावरील कळंब पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलावर टाकण्यात आलेले डांबर निघून गेल्याने रस्ता शोधावा लागत आहे.

कर्जत : मुरबाड रस्त्यावरील कळंब पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलावर टाकण्यात आलेले डांबर निघून गेल्याने रस्ता शोधावा लागत आहे. पुलावरील डांबरीकरण मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते, मात्र या रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. कर्जत -मुरबाड रस्त्याचा भाग असलेल्या चिल्लर नदीवरील कळंब येथील पुलाच्या अडचणी गेल्या तीन वर्षापासून वाढत आहेत. यावर्षी मुरबाड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मे महिन्यात पुलावर डांबर टाकण्यात आले होते . असे असतांना रस्ता सुस्थितीत राहील अशी अपेक्षा वाहन चालकांना होती. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर महिन्याभरात पुलावरील खड्डे नेहमीसारखे दिसू लागले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये किती पाणी साचले आहे याची माहिती नव्याने वाहने घेवून आलेल्या वाहन चालकांना नसल्याने असे वाहन चालक आपली वाहने खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचा परिणाम पुलावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाची दुरुस्ती करणार आहे किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. कारण मुरबाड रस्त्याचे काम ठेकेदार कंपनी करीत आहे .