रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक, भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:35 AM2020-06-06T11:35:16+5:302020-06-06T11:45:48+5:30
चंद्रकांता गोयल या भाजपा नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक झाला आहे. पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. पीयूष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. चंद्रकांता गोयल या महाराष्ट्र विधान परिषदेवर बरीच वर्षे आमदार होत्या.
“आपल्या आपुलकीने आणि प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी लोकांची सेवा केली. मलाही त्यांनी लोकांची सेवा करावी, अशी प्रेरणा दिली. ईश्वर त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे.
अपने स्नेह, और प्रेम से मुझे हमेशा राह दिखाने वाली मेरी पूज्य माता जी का आज सुबह स्वर्गवास हो गया।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 6, 2020
उन्होंने अपना पूरा जीवन सेवा करते हुए बिताया, और हमें भी सेवाभाव से जीवन बिताने को प्रेरित किया। ईश्वर उन्हें अपने श्री चरणों मे स्थान दें। ॐ शांतिः pic.twitter.com/mwlIks6TBJ
पीयूष गोयल यांच्या ट्विटनंतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पूनम महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरवरून चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांता गोयल या भाजपा नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल जी की माताजी चन्द्रकांता गोयल जी के निधन पर गहरा दुःख हुआ। हमारी भावभीनी श्रद्धांजलि। चंद्रकांता गोयल जी ३ बार MLA रही ,जिंदगी भर सदा हसमुख रही और लोगो को हमेशा प्यार बाटने का काम किया। ॐ शांति
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) June 6, 2020
प्रिय श्री @PiyushGoyal जी,
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 6, 2020
माता-पुत्र का संबंध इस जगत का सबसे अनुपम नाता है।
मातृ-शोक से बड़ा कोई शोक नहीं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि पूज्य माता जी की आत्मा को शांति प्रदान करते हुए अपने परमधाम में स्थान दें। दुःख की इस घड़ी में मेरी संवेदनाएं आपके साथ हैं।
ॐ शांति!