“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:28 AM2024-05-14T06:28:39+5:302024-05-14T06:29:14+5:30

ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. भारताला महासत्तेकडे नेणार आहे. हे लक्षात ठेवून मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

piyush goyal will strive for the development of the state along with mumbai said cm eknath shinde | “पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्लीत पीयूष गोयल यांच्या शब्दाला वजन आहे. गोयल बोले, दिल्ली डोले, अशी परिस्थिती आहे. केंद्रीय मंत्री असताना गोयल यांनी मुंबईला खूप काही दिले. यापुढेही ते मुंबई आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

गोयल यांच्या प्रचारासाठी उत्तर मुंबईतील दहीसर येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ‘’अबकी बार, चारसो पार’’चा नारा देत मोदी सरकारला पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. भारताला महासत्तेकडे नेणार आहे. त्यामुळे कमळाला मत म्हणजे मोदींना मत हे लक्षात ठेवून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजप नेते राम नाईक, चंद्रकांत बावनकुळे, प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, मनीषा चौधरी, शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, मनसेचे नयन कदम आदी नेते उपस्थित होते. शिंदेसेनेने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

तुम्ही मतदान केले तर लीड वाढेल

सभेला उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, गोयल यांचा विजय निश्चित आहे. त्यांचा फक्त लीड मोजायचा आहे. पण तुम्ही मतदान केले, तर लीड वाढेल. मोदींनी नव्या संसदेत प्रथम महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही त्यांच्यासाठी सकाळी सात वाजता मतदानासाठी बाहेर पडून परतफेड करायची आहे. तुमच्या कुटुंबीयांनाही मतदानासाठी न्यायचे आहे.


 

Web Title: piyush goyal will strive for the development of the state along with mumbai said cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.