‘पीके’ धर्माच्या नव्हे, अंधश्रद्धेच्या विरोधात - आठवले

By admin | Published: January 2, 2015 01:48 AM2015-01-02T01:48:03+5:302015-01-02T01:48:03+5:30

पीके’ हा सिनेमा हिंदूविरोधी नाही तर अंधश्रद्धेविरोधी आहे. यात चुकीच्या चालीरीतींवर प्रहार करण्यात आला आहे.

'PK' is not against religion, against superstition - Athavale | ‘पीके’ धर्माच्या नव्हे, अंधश्रद्धेच्या विरोधात - आठवले

‘पीके’ धर्माच्या नव्हे, अंधश्रद्धेच्या विरोधात - आठवले

Next

मुंबई : ‘पीके’ हा सिनेमा हिंदूविरोधी नाही तर अंधश्रद्धेविरोधी आहे. यात चुकीच्या चालीरीतींवर प्रहार करण्यात आला आहे. त्यावरील बहिष्काराचा निर्णय चुकीचा असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच ‘पीके’ सिनेमा दाखविणाऱ्या चित्रपटगृहांना आपला पक्ष संरक्षण देईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
मुंबईतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी ही माहिती दिली. आर्थिक हालाखीत असणारे कवी व गायक ज्ञानेश पुणेकर (शिंदे) यांना यावेळी पक्षातर्फे ५० हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. पुणेकर सध्या वडाळा येथील सिध्दार्थ वसतिगृहात आहेत.
शरद पवारांची घेतली भेट
रामदास आठवले यांनी गुरुवारी नववर्षानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही सदिच्छ भेट होती, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'PK' is not against religion, against superstition - Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.