Join us

तिसऱ्या गुणवत्ता यादीत ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:24 AM

प्रवेश निश्चितीची वेळ १८ डिसेंबरपर्यंत; पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक लवकरचलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या ...

प्रवेश निश्चितीची वेळ १८ डिसेंबरपर्यंत; पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक लवकरच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये मुंबई विभागातून ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून १ लाख १९ हजार १७१ जागा उपलब्ध होत्या. त्यातील १ लाख १६ हजार ८० जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तिसऱ्या गुणवत्ता यादीत जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील.

अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार १७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ८ हजार ८६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, तर ६ हजार ८३७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ५७ तर पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्याची संख्या ५ हजार १७३ इतकी आहे.

विशेष म्हणजे तिसऱ्या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार ३६६ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या १,२८९ तर सीबीएसईच्या १,१३६ विद्यार्थ्यांचा तिसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश आहे. सदर यादीत खुल्या गटातील ३६ हजार २५ विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या असून, ईडब्ल्यूएस गटातून केवळ ५७ विद्यार्थ्यांना जागा मिळू शकल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या एसईबीसी संवर्गाच्या जागांचा समावेशही खुल्या सवर्गात करण्यात आल्याने मराठा विद्यार्थ्यानाही खुल्या गटातून प्रवेश मिळाला.

तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर आता प्रवेशासाठी विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी व नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नोंदणीचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया १७ डिसेंबरपासून सुरू हाेईल.

........

शाखा- एकूण जागा - अलॉटमेंट झालेले विद्यार्थी

(कोटा वगळून)

कला - १४,५५७- ३९०८

वाणिज्य- ६३,३५९- २८,८३९

विज्ञान- ३८,८६९-१२,४५३

एचएसव्हीसी- २३६८- २०२

एकूण विद्यार्थी- १,१९,१७१- ४५,४०२

..........

पसंतीक्रम - कला- वाणिज्य- विज्ञान- एचएसव्हीसी- एकूण

पहिला- ७९०-३४९१-१७४९- १४९-६१७९

दुसरा- ८७९-४७९२-२३८२-३३-८०८०

तिसरा- ५९९-४३०६-१९१८-१४-६८३७

चौथा- ४८१-३८२४-१७४७-५-६०५७

पाचवा- ४२१-३४०२-१३५०-०-५१७३

...........