सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई - तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण होवू लागले आहेत. या त्रासातून सुटका व्हावी व उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी अनेकांनी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली आहे. महाबळेश्वरसह कश्मीर व इतर ठिकाणांना पसंती दिली जात असून विदेशात जाणारांचा टक्काही वाढला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून नवी मुंबईत आलेल्या येथील नागरिकांचा दिनक्रम घड्याळाच्या काट्यावर चालतो. अशा धावपळीच्या जीवनातून क्षणभर विश्रांतीची त्यांना संधी मिळते ती केवळ उन्हाळ्यातच. नोकरी, उद्योगातून मिळणार्या थोड्याशा फुरसतीमध्ये पर्यटनासाठी महाबळेश्वर, माथेरान सारख्या ठिकाणांना पसंती मिळत आहे. तर ज्यादा बजेट असलेल्यांकडून थेट जम्मू काश्मीर किंवा थायलंड मलेशियाची उड्डाणे घेतली जातात. त्यामध्ये हौशी तरु ण वर्गाचा सर्वाधिक समावेश आहे.
थंड हवेच्या ठिकाणांना पसंती
By admin | Published: May 25, 2014 3:35 AM