डायरिया नियंत्रणासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:55 AM2018-06-19T06:55:53+5:302018-06-19T06:55:53+5:30

देशात डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा केला आहे. या डायरिया नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशेषत: लहानग्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करण्यात येणार आहे.

Plan outline for diarrhea control | डायरिया नियंत्रणासाठी कृती आराखडा

डायरिया नियंत्रणासाठी कृती आराखडा

Next

मुंबई : देशात डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा केला आहे. या डायरिया नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशेषत: लहानग्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात डायरियामुळे डिहायड्रेशन होण्यास कशाप्रकारे प्रतिबंध करता येऊ शकतो याविषयी उपक्रम राबवले जात आहेत. डायरियासंदर्भात नियोजन, जनजागृती, डायरिया नियोजनासाठी मिळणाºया सोयी-सुविधा बळकट करणे, स्वच्छता याबाबतच्या उपक्रमांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यात, ओआरएस उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवणे, ग्रामीण भागातील शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवणे, अधिकाºयांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत का याकडे लक्ष देणे, पाच वर्षांखालील बालके आणि त्यांच्या मातांकडे प्रामुख्याने लक्ष देणे याकडे या कार्यक्रमाअंतर्गत लक्ष दिले जाईल.
देशात दरवर्षी डायरियामुळे २ लाख बालकांचा मृत्यू होतो. उन्हाळा, पावसाळ्याच्या दिवसांत डायरियाचे प्रमाण मोठ्या प्रमामावर दिसते. डायरियाचा परिणाम कुपोषित बालके, दोन वर्षांखालील बालकांवर अधिक दिसून येतो. या संदर्भात डॉ. जगन्नाथ राठोड यांनी सांगितले की, ग्रामीण भागात डायरियाविषयी बºयाच जणांना आजही माहिती नाही. त्यामुळे जनजागृतीचे प्रमाण अत्यल्प आहे. या नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळात जनजागृती करण्यात येणार असल्याने याचे प्रमाण निश्चित कमी होईल.
>ग्रामीण भागात जागृती
डायरियाचा परिणाम हा कुपोषित बालके, दोन वर्षांखालील बालकांवर अधिक दिसून येतो. या संदर्भात डॉ. जगन्नाथ राठोड यांनी सांगितले की, ग्रामीण भागात डायरियाविषयी बºयाच जणांना आजही माहिती नाही. त्यासाठी जनजागृती करण्यात येईल.

Web Title: Plan outline for diarrhea control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.