Join us

संभाव्य तिसऱ्या काेराेना लाटेसाठी नियोजन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:38 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

ठळक मुद्देदूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोना होण्याचा शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आगाऊ नियोजन करावे, तसेच ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आढावा बैठकीत मुंबई महानगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा सर्व पालिका आयुक्तांना ठणकावले.. 

दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असल्याने तिसऱ्या लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी. त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन, औषधांचा साठा ठेवा!सध्या बऱ्याच ठिकाणी रुग्णसंख्या स्थिरावलेली दिसते. मात्र धोका टळलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनसाठी प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहू नका. औषधांचा साठा, व्हेंटिलेटर पुरेशा संख्येने असल्याची खात्री करून घ्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सुब्रमण्यम स्वामींनी केले ठाकरे सरकारचे कौतुकnमुंबईतील कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ट्विट भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केले.nउद्धव ठाकरे सरकारने मुंबईत कोरोना संक्रमणाचा दर आटोक्यात आणण्यासाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीच पाहिजे. या कामगिरीत सातत्य राखल्यास ते आणखी कौतुकास पात्र ठरतील. मुंबईती रुग्णालये आधीपेक्षा चांगल्या सुविधांनी युक्त झाली आहेत, असे काैतुक त्यांनी ट्विटद्वारे केले.

होम क्वारंटाइन रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणासौम्य लक्षणांच्या होम क्वारंटाइन रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे, जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री यावेळी केली.

अग्निसुरक्षा आवश्यकमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो फिल्ड रूग्णालय, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्निसुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणांची सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या, असे ते म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या