नियोजनाचे वाजले बारा

By admin | Published: April 24, 2015 03:17 AM2015-04-24T03:17:56+5:302015-04-24T03:17:56+5:30

घणसोली व कोपरखैरणेतील ३३ प्रभागांच्या मतमोजणीची सोय घणसोली येथील न्यू बॉम्बे सिटी स्कूल येथे करण्यात आली होती. तिथल्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिसांनी

The plan was twelve o'clock | नियोजनाचे वाजले बारा

नियोजनाचे वाजले बारा

Next

अधिकारी ताटकळले
घणसोली व कोपरखैरणेतील ३३ प्रभागांच्या मतमोजणीची सोय घणसोली येथील न्यू बॉम्बे सिटी स्कूल येथे करण्यात आली होती. तिथल्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बुधवारी रात्री मतपेट्या त्या ठिकाणी आणल्या असता, तिथे कोणत्याही प्रकारची नियोजनबद्ध सोय झालेली नव्हती. त्यामुळे मतपेट्या हातात घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. तर मतमोजणी ज्या ठिकाणी होणार होती, तिथेही विभागनिहाय भाग पाडलेले नव्हते. त्यामुळे या केंद्राची जबाबदारी असलेले सहाय्यक आयुक्त रणजित धुरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर ऐन वेळी रात्रीत त्यांनी आवश्यकतेनुसार सुधारणा करून घेतल्या. नियोजनातील याच त्रुटींचा मनस्ताप मतमोजणीच्या वेळीही पोलिसांना करावा लागला. खापर पोलिसांच्या माथी
मतमोजणी सुरू असताना तेथे आलेल्या अप्पर आयुक्त फतेसिंग पाटील व उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनीही यंत्रणेतील त्रुटींबाबत खंत व्यक्त केली. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मात्र यंत्रणेत कसलीही कमतरता राहिलेली नसल्याचे सांगितले. केंद्राबाहेर कार्यकर्त्यांसाठी दिलेली जागा नियमाप्रमाणे असल्याचे सांगत त्यांनी रस्त्यावर जमणाऱ्या गर्दीचे खापर पोलिसांच्या माथी मारले. त्यामुळे पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मतमोजणी संपेपर्यंत तणतण सुरूच होती.

Web Title: The plan was twelve o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.