Join us

मराठी प्रेक्षकांसाठी आता ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी माध्यम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:12 AM

लोकमत आणि प्लॅनेट मराठी आयोजित १३ ऑगस्ट रोजी वेबिनार

मुंबई : प्रेक्षक दिवसेंदिवस मनोरंजनासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने ओटीटी हे माध्यम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. यामुळे मागील काही महिन्यांमध्ये ओटीटी माध्यमांकडे प्रेक्षकांची ओढ वाढली आहे. परंतु मराठी भाषेसाठी स्वतंत्र असे ओटीटी माध्यम अद्याप उपलब्ध नव्हते. यासाठीच प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि आदित्य ओक यांनी एकत्र येत मराठी भाषेसाठी स्वतंत्र माध्यम तयार करण्याचे ठरविले आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे आता नवनवीन संकल्पनांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. मराठी भाषेत असणारे दर्जेदार कंटेंट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्लॅनेट मराठीचा मानस आहे.‘म मानाचा, म मराठीचा’ या टॅगलाइनसह सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडेल अशा माफक दरात हे माध्यम प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती अक्षय बर्दापूरकर आणि आदित्य ओक यांनी दिली आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करूनच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ माध्यमाची रचना करण्यात येत आहे.यातून मनोरंजनासोबतच मराठी संस्कृतीचे दर्शनही होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याची चर्चा करण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘लोकमत’च्या सहकार्याने १३ आॅगस्ट रोजी वेबिनारचे आयोजन केले आहे. प्लॅनेट मराठीच्या वेगळेपणामुळे अनेक नामवंत मंडळी टीमप्लॅनेटशी जोडली गेली आहेत.तर प्लॅनेट मराठीचा भाग असणाऱ्या प्लॅनेट टॅलेंटच्या माध्यमातून अभिनेत्री अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, सायली संजीव, शिवानी बावकर आणि अभिनेता निखिल चव्हाण ही मंडळी प्लॅनेटसोबत जोडली गेली आहेत.एबी आणि सीडी,च्या यशानंतर गोष्ट एका पैठणीची आणि प्लॅनेट मराठीची तिसरी निर्मिती असलेला चंद्रमुखी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता प्लॅनेट मराठीचं नवंकोरं मराठमोळं ओटीटी माध्यम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.सहभागी होण्यासाठी१३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षय बर्दापूरकर आणिपुष्कर श्रोत्री हे लोकमत सखी मंचाच्या फेसबुक लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादात ते प्लॅनेट मराठी ओटीटी आणि त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ७७३८८७७२२४अथवा नोंदणी करा : https://bit.ly/PlanetMarathi13Aug