मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनची सुरू झाली चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:17 AM2020-12-09T06:17:26+5:302020-12-09T06:18:46+5:30

Mumbai-Nagpur bullet train : मुंबई ते नागपूरपर्यंतच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार करणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे, २०२१ पासून सुरू होत असताना या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनची चाचपणीही सुरू झाली आहे.

Planing of Mumbai-Nagpur bullet train started | मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनची सुरू झाली चाचपणी

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनची सुरू झाली चाचपणी

googlenewsNext

मुंबई : मुंबई ते नागपूरपर्यंतच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार करणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे, २०२१ पासून सुरू होत असताना या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनची चाचपणीही सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पूर्वप्राथमिक चाचपणी करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

मुंबई-नाशिक-नागपूर असा ७४१ किमी लांबीचा हाय स्पीड रेल्वेमार्ग केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. शहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, जहांगिरी, करंजा, पुलगाव, वर्धा आणि नागपूर अशी १२ स्थानके उभारली जातील. मार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविणे, या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर तिथल्या प्रवासाला किती प्रवासी प्राधान्य देतील याचा अंदाज मांडणे, जनरल अरेंजमेंट ड्राॅइंग आणि सामाजिक परिणामांचा आलेख मांडणे अशा प्राथमिक कामांसाठी एनएचएसआरसीएलने निविदा काढल्या होत्या. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.  

आराखड्यासाठी चार काेटींचा खर्च
मार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविण्याचे काम सीकाॅन प्रा. लि. ही कंपनी करणार असून त्यासाठी १४ कोटी २५ लाख रुपये मोजले जातील. सामाजिक परिणामांचा सविस्तर अहवाल आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम मोनार्च कंपनीला मिळाले असून त्यावरील खर्च ४ कोटी ४९ लाख रुपये आहे. 

Web Title: Planing of Mumbai-Nagpur bullet train started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.