Join us

नियोजन 756

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

महामारितही लाचखोरी जोरात ; महसूल, पोलीस सर्वात पुढे !नियोजन 756महामारीतही लाचखोरी जोरात ; महसूल, पोलीस सर्वांत पुढे ...

महामारितही लाचखोरी जोरात ; महसूल, पोलीस सर्वात पुढे !

नियोजन 756

महामारीतही लाचखोरी जोरात ; महसूल, पोलीस सर्वांत पुढे !

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. यात महसूल, पोलीस विभागाची आघाडी कायम आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी ‘जैसे थे’ स्वरूपात पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी मुंबईत लाचखोरीप्रकरणी ६६३ गुह्यांची नोंद झाली. त्यात ६३० सापळा कारवाईचा समावेश आहे. २०१९च्या तुलनेत हा आकडा २३६ने कमी आहे. यात एसीबीच्या पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक १४२ गुन्हे नोंद आहे. पुणे परिक्षेत्राअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लाचखोरी सुरूच आहे. अशात, गेल्या वर्षभराच्या आकडेवारीत महसूल विभाग आघाडीवर होते. त्याखालोखाल पोलीस दलाची आघाडी होती. महसूल विभागात केलेल्या १५६ कारवाईत २१७ जण तर पोलीस दलातील १५४ कारवाईत २१८ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले.

कोरोनाच्या महामारीतही ही लाचखोरी थांबलेली नाही. नुकतेच एसीबीने मुंबईतील आरे दुग्ध डेअरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोडला ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात बेड्या ठोकल्या. त्याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख किमतीची रोकड एसीबीने जप्त केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, एसीबी अधिक तपास करत आहेत.

....

कोणत्या वर्षात किती कारवाया

गुन्हे सापळा कारवाई

२०१८ ९३६ ८९१

२०१९ ८९१ ८६६

२०२० ६६३ ६३०

....

विभागनिहाय कारवाई

(यावर्षी १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंतची कारवाई)

विभाग प्रकरण आरोपी

महसूल/ भूमी अभिलेख/नोंदणी - १६ १९

पोलीस - १८ - ३०

महावितरण - १३ / १९

महानगर पालिका - ६/ ९

पंचायत समिती - ७/१०

अन्न व नागरी पुरवठा - १/१

बांधकाम - १/२

आरोग्य - २/ ३

शिक्षण - ३/ ३

....

पुण्यात सर्वाधिक कारवाया

यावर्षी १ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान एसीबीने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात, २८ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्याखालोखाल नाशिक, औरंगाबादमध्ये कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही पुण्यात (१४२) सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या आहेत.

....

लाच देणेही गुन्हाच...

लाच मागणे जसा गुन्हा आहे तसेच देणेदेखील गुन्हा असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. कोणी लाच मागत असल्यास तत्काळ एसीबीकडे धाव घ्या किंंवा एसीबीच्या १०६४ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात येत आहे.