आरे हा इकोसेन्सिटिव्ह झोन असल्याने आणि प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने आरेत तीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी पालिकेच्या सनियंत्रण समितीची मान्यता आणा असा पवित्रा आरे दुग्ध विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी घेतला होता.
त्यामुळे आज दुपारी पालिका मुख्यालयात सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत अटी व शर्तीवरआरेत कृत्रिम तलाव उभारण्यास सनियंत्रण समितीचा हिरवा कंदील दिला अशी माहिती पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी लोकमतला दिली.लोकमतने सातत्याने गेले काही दिवस सदर विषय मांडला आहे.
आजच्या बैठकीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे,ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ,परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार,राजेश अक्रे,उपवनसंरक्षक,वनखात्याचे अधिकारी आणि दोन पर्यावरण तज्ञ ऑनलाईन होते.
यावेळी सदर परवानगी दिली असली तरी आरेच्या जागेचे मालक आरे दुग्ध विभाग असल्याने आम्ही परवा दि,20 रोजीआरेत तीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यास ना हरकत प्रमाणपत्र द्या असे पत्र आरेच्या सीईओ यांना देणार आहे. त्यांच्या कडून परवानगी मिळाल्यावर मग आरेत कृत्रिम तलाव उभारण्याच्या कामाला पालिका प्रशासन सुरवात करणार असल्याची माहिती अक्रे यांनी दिली.