Join us

नियोजन : कोरोनाच्या काळातही मुंबईत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही चोरट्यांचा मात्र धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र मुंबई पोलिसांकडे ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही चोरट्यांचा मात्र धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र मुंबई पोलिसांकडे दाखल होत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांवरुन समोर येत आहे. यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात तब्बल १ हजार १२९ चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी अवघ्या ३९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी मुंबईत चोरीच्या ३ हजार ४३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी १ हजार १९५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०१९ मध्ये हाच आकडा ५ हजार ८८८ होता. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या एप्रिल, मे महिन्यात गुन्हेगारीला पूर्णत: ब्रेक लागला होता.

मात्र अनलॉक होताच पुन्हा परिस्थिती जैसे थे स्वरुपात येण्यास सुरुवात झाली. अशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली; मात्र तरीही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यात जानेवारी ते मार्च दरम्यान मुंबईत १० हजार १७५ गुन्हे नोंद झाले. यात चोरीच्या १ हजार १२९ घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी याच ३ महिन्यात १ हजार २९८ गुन्हे दाखल झाले होते.

तर यात वाहन चोरी (९०१), घरफोडी (४४३) गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलिसांकड़ून ठिकठिकाणी गस्त ठेवून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

...

१) पॉईंटर्स

२०१९मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- ५,८८८

२०२०मध्ये झालेल्या चोरीच्या घटना- ३,४३३

मार्च २०२१ पर्यंत झालेल्या चोरीच्या घटना - ११२९

....

हत्येच्या घटनेत वाढ

यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ४३ घटना घडल्या. गेल्यावर्षी याच ३ महिन्यात ३९ घटनांची नोंद झाली आहे. यावर्षी हा आकडा ४ ने वाढला आहे.

...

बलात्कार प्रकरणी २३३ गुन्हे

जानेवारी ते मार्च दरम्यान बलात्कार प्रकरणी २३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात अल्पवयीन मुलींप्रकरणी १३४ गुन्ह्यांचा समावेश आहे.

...