धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:31 PM2023-11-08T15:31:47+5:302023-11-08T15:49:12+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली.

Plans for Dhangar community, Air India to take over building soon; Maharashtra Cabinet took 11 important decisions | धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णय-

  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. ( इतर मागास बहुजन कल्याण) 
  • राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग) 
  • मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग) 
  •  अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे  राज्य निवड मंडळामार्फत भरणार ( वैद्यकीय शिक्षण)
  • मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. ( वस्त्रोद्योग विभाग)   
  • गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार ( इतर मागास बहुजन कल्याण )
  • विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा ( सहकार विभाग) 
  • मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार ( पर्यटन विभाग) 
  • बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार ( गृह विभाग)
  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार ( पशुसंवर्धन) 
  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व  दंड माफ ( सार्वजनिक बांधकाम विभाग)

Web Title: Plans for Dhangar community, Air India to take over building soon; Maharashtra Cabinet took 11 important decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.