कोट्यवधी खर्चूनही उद्याने-मैदाने बकाल; पालिकेच्या प्रस्तावाला विरोधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:15 AM2017-12-17T03:15:37+5:302017-12-17T03:15:43+5:30

मुंबईतील उद्यान व मैदानांच्या देखभालीवर गेल्या तीन वर्षांत महापालिकेने सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या उद्यान व मैदानांची स्थिती जैसे थेच असताना, नाव बदलून आलेल्या त्याच ठेकेदाराला कंत्राट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला होता.

 Plans-grounds will be spent on billions of crores; Opponent's objection to the proposal of the corporation | कोट्यवधी खर्चूनही उद्याने-मैदाने बकाल; पालिकेच्या प्रस्तावाला विरोधकांचा आक्षेप

कोट्यवधी खर्चूनही उद्याने-मैदाने बकाल; पालिकेच्या प्रस्तावाला विरोधकांचा आक्षेप

Next

मुंबई : मुंबईतील उद्यान व मैदानांच्या देखभालीवर गेल्या तीन वर्षांत महापालिकेने सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या उद्यान व मैदानांची स्थिती जैसे थेच असताना, नाव बदलून आलेल्या त्याच ठेकेदाराला कंत्राट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला होता. मात्र, विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने, अखेर हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे.
मुंबईत ३२१ उद्यानांच्या देखभालीचे कंत्राट संपले आहे. नवीन प्रस्तावानुसार, तीन वर्षे उद्यान व मैदानांच्या देखभालीसाठी ठेकेदाराने अंदाजित रकमेच्या १० ते ३५ टक्के कमी बोली लावली होती. मात्र, या दोन्ही कंपन्या एकाच मालकाच्या असून, त्यांनी संगनमताने कंत्राट मिळविल्याचे समोर आले. मात्र, तीन वर्षांत विकास आणि देखभालीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून उद्यान बकाल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.
गेल्या तीन वर्षांत एक हजार कोटींहून जास्त रक्कम खर्च केल्यानंतरही उद्यान व मैदानांची स्थिती सुधारली नाही. त्यामुळे पुन्हा त्याच ठेकेदारांच्या हाती देखभालीचे काम देण्यास समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी आक्षेप घेतला. देखभाल व विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करून, उद्यान व मैदानाची स्थिती बदलणार नसेल, तर असे प्रस्ताव मंजूर का करायचे? कोणत्याही ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी कंत्राट दिले जाणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला.

उद्यान-मैदानांच्या
देखभालीवर खर्च (कोटी)
२०१४-२०१५-१५.६०
२०१५-२०१६- ७५.७६
२०१६-२०१७-१००
२०१७-२०१८-१३१.९४
विकासकामांवर खर्च (कोटी)
२०१४-२०१५-१५.९४
२०१५-२०१६-२३५.८६
२०१६-२०१७-२८८.४३
२०१७-२०१८-३०१.३२

Web Title:  Plans-grounds will be spent on billions of crores; Opponent's objection to the proposal of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई