प्लॅस्टिकबंदीऐवजी नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:55 PM2018-10-26T23:55:29+5:302018-10-26T23:56:30+5:30

कोणत्याही द्रव पदार्थाच्या वापरासाठी प्लॅस्टिकबंदीऐवजी त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)मधील फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. उदय अन्नपुरे यांनी व्यक्त केले आहे.

 Plans need to be replaced instead of plastic | प्लॅस्टिकबंदीऐवजी नियोजन गरजेचे

प्लॅस्टिकबंदीऐवजी नियोजन गरजेचे

googlenewsNext

मुंबई : कोणत्याही द्रव पदार्थाच्या वापरासाठी प्लॅस्टिकबंदीऐवजी त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)मधील फूड इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. उदय अन्नपुरे यांनी व्यक्त केले आहे. तेल तंत्रज्ञान मंडळाने बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ड्रिंक टेक्नॉलॉजी इंडिया २०१८ (डीटीआय) या प्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून ते पूर्णपणे नष्ट करण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
प्राध्यापक अन्नपुरे म्हणाले की, पॅकेजिंग क्षेत्रामध्ये प्लॅस्टिकचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: तेल उद्योगात प्लॅस्टिकमुळे संबंधित पदार्थाचे जीवनमान वाढते, तसेच पदार्थाची गुणवत्ताही टिकून राहते. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या प्लॅस्टिकला १०० टक्के पर्याय नाही. त्यातही पर्यायी वस्तू निसर्गपूरक असायला हवी, असे म्हटले, तरी तसे करतानाही निसर्गावर किती ताण येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी प्लॅस्टिकला पर्यावरणपूरक वस्तू निसर्गातून घेता येणार नाहीत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत नियोजन करताना, प्लॅस्टिक कचऱ्याची कमीतकमी निर्मिती करण्याची खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी ग्राहकांना पदार्थ हाताळणे सोपे ठरावे. हे सर्व करताना संबंधित पदार्थाच्या किमतीत मात्र वाढ होऊ नये, याचाही कटाक्षाने विचार करावा लागत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उद्देश हा गुणवत्तापूर्ण वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे.
>प्लॅस्टिकला फायबरचा पर्याय
या प्रदर्शनात अनेक कंपन्यांनी फायबरच्या रूपात प्लॅस्टिकला सुचविलेल्या पर्यायाचे अन्नपुरे यांनी स्वागत केले. कागदही प्लॅस्टिकला चांगला पर्याय असला, तरी मोठ्या प्रमाणात कागदाची उपलब्धता नसल्याचेही त्यांनी मान्य केले. या वेळी देशाचे तेल तंत्रज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाबर, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पॅकेजिंगचे संचालक प्रा. एन. सी. सहा आणि युरोपीयन अ‍ॅल्युमिनियम फॉइल असोसिएशनचे वरिष्ठ कार्यकारी सल्लागार स्टीफन ग्लिम यांनी देशातील पेय, दुग्ध व द्रव खाद्य उद्योगासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय यांवर मार्गदर्शन केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी शुक्रवारपर्यंत मोफत असल्याचेही डीटीआयने स्पष्ट केले.

Web Title:  Plans need to be replaced instead of plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.